डॉ. पराग धारप - M.D.(PATH), D.P.B. यांनी स्थापन केलेले "डॉ. धारप डायग्नोस्टिक सेंटर" १९९४ पासून दादर परिसरात कार्यरत असून, उच्च दर्जाची आरोग्य चिकित्सा सेवा वाजवी दरात देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पॅथॉलॉजिस्ट म्हणून २८ वर्षांचा अनुभव असलेले डॉ. पराग धारप हे गुणवत्ता नियंत्रण (Quality Control), लॅब मेडिसिन आणि डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रातील एक प्रसिद्ध तज्ञ म्हणून ओळखले जातात. अत्याधुनिक चिकित्सा उपकरणे आणि चिकित्सा क्षेत्रासंबंधीच्या संशोधनाची आवड असलेले अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले या विषयी शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत आणि त्यावर भारतभर व विदेशात अनेक व्याख्याने दिली आहेतआणि चर्चासत्रामधून भाग घेतला आहे.
डॉ. प्रिया धारप - M.B.B.S., M.M.S, हेल्थकेअर मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मॅनेजमेंट स्टडीजमध्ये मास्टर्स केलेल्या अनुभवी डॉक्टर आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा कंपन्यांमध्ये हेल्थकेअर मॅनेजमेंटच्या भूमिकेत काम केले आहे. आमच्या रुग्णांना दर्जेदार, स्वस्त आणि सुलभ आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.
डॉ. धारप डायग्नोस्टिक सेंटरचे उद्दिष्ट:
आंतरराष्ट्रीय चिकित्सा गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचा परिणामकारक वापर करून आधुनिक उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्या सहाय्याने रुग्णांच्या सेवेबद्दलच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करणे ही आमची वचनबद्धता आहे.
आमच्या व्यवस्थापकीय कार्यप्रणालीचा "गुणवत्तेची हमी (QA)" हा एक अविभाज्य भाग आहे. सर्वोत्कृष्ट रुग्ण सेवा देण्यासाठी केलेल्या तपासांची विश्वासार्हता आणि अचूकता असणे ही प्राथमिक गरज असते जी या गुणवत्तेच्या हमीनंतरच मिळू शकते. आमच्या येथे अशा गुणवत्ता नियंत्रण प्रणालीतून तावून सुलाखूनच निकालांचे परीक्षण व प्रमाणीकरण केले जाते. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मूल्यांकन योजनांमध्ये देखील सहभागी होतो. या विषयीची अधिक माहिती आमच्या "वारंवार विचारले जाणारे प्रश्न" विभागात मिळेल.
डॉ. धारप डायग्नोस्टिक सेंटर हे मुंबईच्या मध्यभागी असलेल्या दादर पश्चिम रेल्वे स्थानकापासून चालत ८ ते १० मिनिटांच्या अंतरावर आहे. आम्ही रक्त निदान आणि ईसीजीसाठी जवळपासच्या भागात घरी जाऊनही ही सेवा देतो.
आमच्या दोन डॉक्टरांसह प्रशिक्षित लॅब तंत्रज्ञ व इतर कर्मचारी आपल्याला विश्वासार्ह सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असतात.
आमच्या सेवांविषयी काही सल्ला हवा असल्यास किंवा आपण करून घेतलेल्या चाचण्याविषयी काही प्रश्न असल्यास आमचे डॉक्टर आपल्या शंकानिरसनासाठी उपलब्ध असतात. ही सेवा संपूर्णपणे निशुल्क आहे.
अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आम्हाला कॉल करा!